Nanded News 
मराठवाडा

Video : विधायक : शहर वाहतूक शाखेने दिला गरजूंना मदतीचा हात 

प्रल्हाद कांबळे

नांदेड :  लॉकडाऊनमध्ये हातावर काम असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येत आहे. अशांना मदतीचा हात द्यावा म्हणून नांदेड शहर वाहतूक शाखेच्या वतीने पांगरी येथील गरजूंना अन्नधान्यांचे वाटप केले. खाकीतील ही माणुसकी पाहून पांगरीकर काहीक्षण भारावून गेले होते.

कोरोना विषाणूला हरविण्यासाठी देश लॉकडाऊन झाला आहे. परिणामी, हातावर पोट असलेल्या कुटुंबाचे मोठे हाल होत आहे. हाताला काम नसल्याने घरामध्ये चूल पेटवणे अवघड झाले आहे. अर्थातच उपासमारीशी अशा कुटुंबियांना सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबियांना विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धान्याच्या स्वरूपात, अन्नदानच्या स्वरूपामध्ये मदत केली जात आहे. परंतु, ती तोकडीच आहे. त्यासाठी नांदेडच्या शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम आपल्या सहकाऱ्यांसह मदतीचा हात द्यायला पुढे आले.  पांगरी येथील गरजू लोकांना त्यांच्या टिमने गुरुवारी (ता.१६) अन्नधान्याचे वाटप केले. 

सामाजिक बांधिलकी जोपासली
देशभरात कोरोनाचं संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. या कालावधीत सर्वत्र संचार बंदीचे आदेश लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे घराबाहेर कोणीही पडू नये असे आदेश असल्याने बहुतांश भागातील हातावर पोट असणाऱ्या नागरिकांसमोर रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा आहे.  अशा परिस्थितीत अनेक सामाजिक संस्थांकडून गरजवंतांना मदतीचा हात पुढे केला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात तगडा पोलिस बंदोबस्त देणारे नांदेड शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हेही सामाजिक मदतीसाठी मागे राहिले नाहीत. 

अडचणीच्या काळात आले धावून
एरवी खाकीतील अधिकारी म्हणून त्यांचा असलेला दरारा अनेकांनी पाहिलेला आहे. वीनाकारण फिरणाऱ्यांना आणि कायदा मोडणाऱ्यांची कधीही गय न करणाऱ्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्यातील माणूसकी गुरुवारी पंगरा येथील नागरिकांना बघायला भेटली. हातावर पोट असणाऱ्या लोकांना गहू, तांदूळ, तेल, मीठ, डाळ असे अन्नधान्य देऊन अडचणीच्या काळात लोकांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम शहर वाहतूक शाखेने केले आहे. 

सामाजिक भावनेतून केली मदत
वाहतूक व्यवस्था सुरळीत करणेच नव्हे तर मानवी जीवनात आलेल्या अडचणीची साखळी बाजूला करत अनेकांच्या जीवनात आनंद देण्याचे कामही शहर वाहतूक शाखेच्या वतीने होत आहे. या कामी पोलिस हेड कॉन्स्टेबल काकासाहेब रोडके, बळीराम धुमाळ, पोलिस नाईक गणेश दाबनवाड, चालक सुरेश लोणीकर यांची मदत झाली. 
- चंद्रशेखर कदम, पोलिस निरीक्षक (शहर वाहतुक शाखा, नांदेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: 'श्रेयस अय्यर -गंभीरला काढून टाकण्यापेक्षा जरा विचार करा आणि IPL... ', संजय मांजरेकरांची BCCI वर सडकून टीका

Ishwarpur Municipality Politics : गाफील जयंतराव युतीच्या खिंडीत अडकले; जयंत पाटील यांचा 'आनंद' अल्पजीवी ठरला, मुरब्बी राजकारणी कसा राहिला गाफील?

Beed: एटीएमचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

Smartphone Survey: स्क्रीन फुटली,फोन बदलला! ५३% भारतीयांनी खरेदी केला नवीन फोन!

SCROLL FOR NEXT